Saturday, May 23, 2020

अन्न हे परब्रम्ह

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

    🌹🌹       ॥अन्न हे परब्रम्ह ॥     🌹🌹

आपल्याला घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते. म्हणून अन्न ग्रहण करताना या गोष्टींची काळजी घ्यावी:

घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या.

शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका.


अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो.

एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते.

मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये.

घर असो वा हॉटेल, कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात.

जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावती काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. तसेच मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते.

अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो.

अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात अन्न पुरवणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात. त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये.

मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा.


आपली परंपरा अशी आहे की आपण भर दुपारी कोणी आपल्या दारात आल्यास त्याला विन्मुख परत पाठवू नये.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
शास्त्रात सांगितलेले आहे.
 "अतिथी देवो भव'

पशुपक्ष्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकटे येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो.

अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते.

म्हणून कधीही अन्नावर राग काढू नये

आपली संस्कृती

Tuesday, May 19, 2020

खरी परिस्थिती पाहून निष्कर्ष काढवा

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

           🌹🌹 खरी परिस्थिता  🌹🌹
ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक संत पहाटे समुद्र किनारी फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक व्यक्ती महिलेच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आहे आणि जवळच एक मदिराची बाटलीसुद्धा ठेवलेली होती. संतांना वाटले की, हे किती पापी मनूष्य आहेत. सकाळीच मदिरा सेवन करून अशा अवस्थेत पडलेले आहेत. यांना एवढेसुद्धा भान नाही की एका सार्वजनिक ठिकाणी आपण कसे वागावे. विचार करून संत पुढे निघाले. थोड पुढे गेल्यानंतर त्यांना एक व्यक्ती समुद्रात बुडत असल्याचे दिसले. संतांना त्याची मदत करायची होती पण त्यांना पोहता येत नव्हते. म्हणून हताश होऊन ते किनाऱ्यावरच उभे राहिले. तितक्यात महिलेच्या मांडिवर डोके ठेऊन झोपलेला व्यक्ती उठला आणि समुद्रात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले.

यावर संत विचारात पडले की आता या व्यक्तीला काय बोलू. याने तर एका माणसाचे प्राण वाचवून खूप मोठे पूण्य केले आहे. संत लगेच त्या व्यक्तीजवळ गेले आणि त्याला विचारले की आपण कोण आहात आणि येथे काय करताय?

यावर त्या व्यक्तीने सांगितले की, गुरूजी मी एक मच्छीमार आहे. बऱ्याच दिवसांपासून समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलो होतो, आज सकाळीच किनाऱ्यावर परत आलो आहे. महिलेकडे बघून तो म्हणाला की ती माझी *आई* आहे आणि मला घरी नेण्यासाठी आली आहे. घरात भांडी नसल्यामुळे तीने मदिराच्या बाटलीत पानी भरून आणले. लांबच्या प्रवासामुळे खूप थकलो होतो म्हणून किनाऱ्यावर *आई* च्या मांडीवर डोके ठेवून झोपलो होतो.

हे ऐकून संताच्या डोळ्यात पाणी आले, त्यांना वाटले मी अत्यंत वाईट विचार करत होतो. समोर पाहिले ते सत्य मानून त्यांच्याविषयी वाईट विचार करत होतो. पण वास्तविकता मात्र वेगळीच आहे.

*कथेची शिकवण*
कोणतीही गोष्ट आपण बघत असतो ती दिसते तशी नसते, त्याची एक दूसरी बाजू असते. म्हणून कोणत्याही गोष्टीबाबत आपले मत व्यक्त करण्याआधी चांगला विचार करावा. *सर्व पैलूंचा विचार केल्यानंतरच निष्कर्षापर्यंत जायला पाहिजे.* नाहीतर आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते
       🌹🌹 धन्यवाद 🌹🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

Thursday, May 14, 2020

महाभारतातील तत्त्वज्ञान









💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
     
    👍👍 महाभारत आणि तत्त्वज्ञान 👍👍

महाभारतात असे म्हंटले आहे की सुमारे ८०% मनुष्यबळ युद्धाच्या अठराव्या दिवशी मृत्युमुखी पडले होते. जेव्हा युद्ध संपले तेव्हा संजय युद्ध झाले तिथे म्हणजेच कुरुक्षेत्राच्या मैदानात आला. त्याचा मनात शंका आलेली होती की हे युद्ध खरंच झाले आहे का? खरंच एवढा मोठा नरसंहार झालेला आहे का? ती हिच जागा आहे का जिथे सामर्थ्यवान पांडव आणि भगवान श्रीकृष्ण उभे होते? ही तीच जागा आहे का जिथे श्रीमद् भगवत गीता सांगितली गेली? हे सगळे खरंच झाले आहे की मला तसा भ्रम होतोय??
"तुला कधीच ह्याचे सत्य माहित होणार नाही!!", एक शांत वयोवृद्ध आवाज त्याचा कानी पडला. संजयने आवाज आलेल्या दिशेला पाहिले तर त्याला एक साधू तिथे दिसला. साधू हलक्या आवाजात परत म्हणाला, "मला माहित आहे तू इथे कुरुक्षेत्राचे युद्ध खरंच झाले आहे का ते पाहायला आला आहेस. परंतु तुला ह्या युद्धाबद्दल सत्य कधीच समजणार नाही जोपर्यंत तुला खरे युद्ध कसले होते ते कळणार नाही."
संजय म्हणाला, "म्हणजे??"
साधू म्हणाला, "महाभारत हे एक महाकाव्य आहे - एक वास्तविकता आहे परंतु त्यापेक्षा अधिक ते एक तत्वज्ञान आहे." आणि एवढे सांगून तो हसू लागला. साधूचे हसणे पाहून संजय अजून जास्त भ्रमित झाला आणि विनंती करू लागला की, "मला तुम्ही ते तत्त्वज्ञान सांगू शकतात का?"
साधू ते तत्वज्ञान सांगू लागला, पांडव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपले ५ ज्ञानेंद्रिये आहेत.

डोळे (दृश्य),

कान (आवाज),

नाक (गंध),

जीभ (चव) आणि

त्वचा (स्पर्श).

आणि कौरव म्हणजे १०० दुर्गुण (विषये) आहेत जे दररोज ह्या ५ पांडवांवर आघात करतात. पण आपण ह्या आघातापासून आपल्या ५ पांडवांचे रक्षण करू शकतो. साधू म्हणाला, "संजय, तुला सांगता येईल ह्यांचे रक्षण करणे कधी शक्य होईल?"
"जेव्हा आपल्या रथाचे सारथी - ह्या ५ पांडवांचे मित्र भगवान श्रीकृष्ण असतील तेव्हा????". साधू उत्तर एकून खूप खुश झाला. तो म्हणाला, "अगदी बरोबर!! श्रीकृष्ण म्हणजे आपल्या आतला आवाज, आपला आत्मा, आपला पथदर्शी प्रकाश. जर श्रीकृष्णचे आपण ऐकतोय तर आपल्याला चिंता करायची काहीही आवश्यकता नाही."
संजयला बराच मतितार्थ आता कळला होता. तरी त्याने परत प्रश्न केला, "मग जर कौरव हे दुर्गुणच होते तर त्यांच्या बाजूने गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म लढले त्याचा काय अर्थ होतो??"
"त्याचा असा अर्थ होतो की, जसे तुम्ही लहानाचे मोठे होत जातात तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांबद्दल असलेला तुमचा दृष्टीकोन बदलत जातो. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला ते एकदम परिपूर्ण वाटतात परंतु जेव्हा आपण मोठे होऊन जातो तेव्हा आपल्याला त्यांच्यात त्रुट्या दिसायला सुरु होतात आणि एकदिवशी आपल्याला ठरवावे लागते की आपण ह्या मोठ्यांचे ऐकायचे की नाही, ह्यांनी आपले ठरवायचे की आपण स्वतःच स्वतःसाठी निर्णय घ्यायचा!!! म्हणून अशा धर्मसंकटात श्रीमद् भगवत गीतेचे उपदेश महत्वाचे ठरतात."
संजयला आता सगळेच कळले होते. त्याने शेवटचा प्रश्न केला, "मग कर्णहा पांडव असून त्यांच्याच विरोधात का??"
"अरे हा!! कर्ण हा, ५ ज्ञानेंद्रियेसारखाच आपला असतो. तो आपलाच एक भाग असतो परंतु साथ देतो त्या १०० दुर्गुणांची!! हा कर्ण दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या स्वतःच्या वासना असतात. हे आपल्याच असतात परंतु त्यांची मैत्री १०० दुर्गुणांशी असते. कर्णाला सारखा पश्चात्ताप होत असतो आणि तो दुर्गुणांची साथ का देतोय त्याचे सतत कारणे देत राहतो. आपली वासनापण अशीच असते - पश्चात्ताप करते आणि परत तिथेच जाते.!!"
संजयच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. त्याला जगातले सगळ्यांत मोठे महाकाव्य "महाभारत" खऱ्या अर्थाने समजलेले असते. तो दूरवर पसरलेल्या कुरुक्षेत्राला पाहत उभा असतो. तो साधूला नमन करण्यासाठी मागे वळतो आणि पाहतो तर त्या जागी कोणीच नसते - तो साधू दिसेनासा होतो परंतु एक गहन तत्वज्ञान तिथे ठेवून जातो.

       🌹🌹 धन्यवाद🌹🌹
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
 

लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान व संधी

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  👍👍लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान व संधी 👍👍

    😏😏  नुकसान 😏😏

*१. पर्यटन क्षेत्र -* लोक हौसेखातर फिरायचं कमी करतील. याचा परिणाम टुर्स ॲंड ट्रॅव्हल्सच्या कंपन्या, हॉटेल्सवर होईल. सगळ्यात जास्त नुकसान पर्यटन उद्योगाचेच होईल.

*२. तीर्थक्षेत्रे -* भारतात पर्यटन म्हणून लोक तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. भक्तांमुळे मंदिरांना दक्षिणा स्वरूपात चांगला निधी मिळत असतो. कमी झालेल्या गर्दीमुळे भक्तांमार्फत मिळणाऱ्या देणगीचा ओघ कमी होईल.

*३. रेस्टॉरंट -* बाहेरचं खाणं लोक कटाक्षाणे टाळतील. छोट्या मोठ्या खानावळी, पावभाजी, भेळ इत्यादीचे ठेले, मोठे रेस्टॉरंटस या सगळ्यांवर परिणाम जाणवेल.

*४. बॅंकिंग सेक्टर -* लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंदच आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या मिळकतीवर जाणवतोय. अनेकांच्या नौकऱ्या गेल्या असतील. अनेकांनी कर्जाचे हफ्ते थकवले आहेत. त्यामुळे बॅंकिंग सेक्टरला झळ जाणवेल.

*५. सार्वजनिक उत्सव -* गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, गावच्या जत्रा इत्यादी उत्सवाच्या ठिकाणी लोकांची रेलचेल पुर्वीपेक्षा कमीच असेल. या उत्सवांवर अवलंबून असलेल्या छोटेमोठ्या व्यावसायिकांना थोडीफार झळ पोहचेल.

*६. लग्न आणि समारंभ -* मध्यम आणि छोट्या शहरांत आजही १००० ते २००० लोक लग्नात आमंत्रित असतात. केटरिंग, मंडप, लॉन्स, कपडे या सगळ्यात नाही म्हणलं तरी एका लग्नातून २०-२५ लाखाची उलाढाल होते. आता लग्नसमारंभ निवडक लोकांमध्येच होतील. इव्हेंट क्षेत्राला फटका बसेल.

*७. नाट्यगृह आणि चित्रपटगृह -* नाट्यगृह आणि चित्रपटगृहांत सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली १ सीट सोडून बसायची व्यवस्था करावी लागणार असं वाचण्यात आलं. ही व्यवस्था कायमस्वरूपी नसली तरी काही दिवसांसाठी का होईना यामुळे नाट्यगृह, चित्रपटगृहांचे नुकसान होईल.
 


१. आरोग्य तपासणी आणि चाचणी केंद्र - लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोना पण संपून जाईल असे नाही. कोरोना कुठेच जाणार नाहीये, आपल्याला या विषाणूसोबत रहायची सवय करून घ्यावी लागेल. अधुनमधुन लाट येतच राहील आणि अशावेळी चाचणी केंद्रांची गरज पडेल. सध्या चाचणी केंद्रांचे प्रमाण कमी आहे. सरकार ही केंद्रे वाढवण्यावर भर देईल. भविष्यात यात संधी राहील.

२. फुड डिलीव्हरी - लोक बाहेर जाऊन खायचं टाळतील पण बाहेरचं खाणं टाळणार नाहीत. फुड डिलीवरी वाल्यांचा धंदा वाढेल.

३. सुरक्षा साधनांची निर्मिती - मास्क, ग्लोव्हज, सॅनिटाईझर इत्यादीची मागणी वाढेल. या संबंधीत निर्मिती उद्योगांना अच्छे दिन आताही चालू आहेत, नंतरही राहतील.

४. वाहन उद्योग - चीनमध्ये लॉकडाऊन नंतर सार्वजनिक ठिकाणी इतर लोकांशी संपर्क येऊ नये म्हणून लोकांनी चारचाकी खरेदीवर जोर दिला. परिणामी त्यांचा वाहन उद्योग जोमात चालू आहे. भारतात आर्थिक मंदीची परिस्थिती सुधारल्यास वाहन उद्योगाला चांगले दिवस येऊ शकतात.

५. वाहतूक - सार्वजनिक वाहतूक टाळण्यासाठी लोक गाड्या घेतीलच याची शाश्वती नाही कारण सध्या असलेली मंदी. पण याला पर्याय म्हणून खाजगी वाहतूक (टॅक्सी, रिक्षा) याला मागणी वाढेल.

६. कोचिंग - शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेसमुळे शाळा, कॉलेजवर फारसा फरक जाणवणार नाही. कदाचित होमस्कुलिंगकडे कल वाढू शकतो. पण याचा परिणाम नगण्यच राहील. ऑनलाईन क्लासेस सुरू करून खाजगी शिकवणी वाल्यांना संधी उपलब्ध होऊ शकतात.

                      *धन्यवाद..!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

Tuesday, May 12, 2020

तुळशीचे महत्त्व

     🌿🌿🌿🌿🌿🌿 🌿 तुळस  🌿🌿🌿🌿🌿🌿

      मानवी जीवनात तुळशीचे महत्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मुलन करते. तुळशीचे ५ प्रकार आहेत. कृष्ण तुळस, दहीद्र तुळस, राम तुळस, बाबी तुळस आणि तुकाशामीय तुळस. उष्णतेच्या विकारात तुळशीचे बी पाण्यात भिजत घालून त्याची खीर घेतात. अर्धांगवायू आणि संधिवात यात तुळशीच्या पानांच्या काढ्याची वाफ घेतात. निद्रानाशावर काळ्या तुळशीच्या पानांच्या गोळ्या घेतात. एकाग्रता वाढवण्याचा गुण हि तुळशीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पानांच्या सेवनाने विशेष उपोयोग होओ. प्रसिद्ध चिकित्सक डोक्टर उपेन्द्र रे यांनी संशोधनाने सिद्ध केले आहे कि तुळशीच्या पानात *कर्करोग , हृदयरोग, किड्नीचे विकार आणि त्वचा रोग बरे करण्याची अपूर्व शक्ती आहे.* बारीक ताप, खोकला, सर्दी या विकारात तुळस गुणकारी आहे तसेच तुळशीची पाने डासांना दूर पळवितात.
प्रख्यात निसर्ग उपचार तज्ञ श्री.कार्तिकेय महादेविया म्हणणतात तुळशीची पाने दही किंवा गोड ताकाबरोबर खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते आणि वजन कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते आणि वजन कमी झले तरी थकवा येत नाही. तुळशीत मानसिक ताण कमी करण्याचा हि गुण आहे.
मूळव्याध, दम, कोरडी खरुज , कावीळ, केस गळणे, क्षयरोग अश्या अनेक रोगांवर तुळस गुणकारी आहे. या गुणांमुळेच आज जगभर तुळशीवर विशेष संशोधन होत असून तुळशीच्या अर्कापासून सिरप , गोळ्या आणि तेल बनवण्यात येते. तुळशीचा चहा हि निसर्गौपाचारातील एक खास निर्मिती आहे.
आपल्या अंगणात तुळशीची विपुल झाडे लावली तर त्या झाडांच्या सहवासामुळे प्रतिकार शक्ती वाढून अनेक छोट्या रोगांपासून सुरक्षित राहता येते. रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या झाडासमोर बसून दिघ श्वसन केल्यास आरोग्य मिळेल. तुळशीतील या अलौकिक गुणधर्मामुळे आपल्याशी तिचा रोज संपर्क यावा म्हणून आपल्या पूर्वजांनी अनेक व्रत वैक्ल्यात तुळशीचा समावेश केला आहे.
वैशाखातील शुद्ध प्रतिपदेला आणि संक्रांतीच्य दिवशी तुळशीला अभिषेक करतात. वैशाखात रोज तुळशीला पाणी घातल्यास अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते असे म्हणतात. जो मनुष्य रोज तुळशीला दुधाने अभिषेक करतो त्याचे आरोग्य चांगले राहते आणि त्याच्याकडे लक्ष्मी नांदते. जो उन्ह्याळ्यात तुळशीला पाणि देतो त्याची सर्व पापे धुतली जातात असे शास्त्र वाचन आहे.
कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौणिमे परेंत तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. ओरिसातील कुमारिका अश्विनी पौणिमेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ चंद्राची पूजा करतात. त्यामुळे चांगला पती मिळतो अशी भावना आहे. आपल्याला एकादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात. म्हणजे ती वस्तू ईष्ट देवतेकडे पोहचते अशी समजूत आहे.
आपल्या देशाप्रमाणे ग्रीस देशात अजूनही *संत बेसिल डे* नावाचा उत्सव साजरा करतात. या दिवशी तेथील स्त्रिया घरात तुळस आणून तिची पूजा करतात.
कार्तिक महिन्यात तुळशीने विष्णूची पूजा केल्यास त्याला विशेष महत्व आहे. पूर्वीच्या काळी घरोघरी संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावण्याची पद्धत होती तसेच सकाळी तुळशीला पाणी घालून तिला प्रदक्षिणा घालत त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असे. वारकरी स्त्रिया तुळशीची माळ गळ्यात घालून तसेच डोक्यावर तुळस घेऊन वारीला जातात. प्रवासाला जाताना तुळशीला उजवीकडून प्रदक्षिणा घालतात त्यामुळे प्रवास निर्विघ्न पार पडतो अशी समजूत आहे.
केरळमध्ये तुळशीला खूप महत्व आहे. तेथे प्रत्येक घरात तुळशीवृन्दावन असतेच. त्यांच्याकडे विवाह प्रसंगी वधु -वरांना तुळशीचे हार घालतात. ज्याच्या घरी तुळशीचे बन आहे ते घर तीर्थक्षेत्रासारखे समजतात.
तुळशीची महती सांगावी तेवढी थोडीच आहे. तुळशीचे मानवावर अनंत उपकार आहेत म्हणून *प्रत्येकाने आपल्या दारात तुळशीचे झाड लावण्याचे व्रत घेऊ या   
  🌺🌺🌺🌺   धन्यवाद🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

कोरोना होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी

*कोरोना* *रोग लवकर नष्ट होईल असे वाटत नाही ,तथापी आपल्याला काम हे *करावेच* *लागणार आहे* .
*दैनंदिन जीवनामध्ये  आपला रोज अनेक लोकांशी संपर्क येतो त्यामुळे यापुढे किमान १ वर्ष खालीलप्रमाणे *काळजी* *घेणे अत्यंत आवश्यक झालेले आहे* .

*१) जितका वेळ शक्य असेल तितका वेळ सार्वजनिक शौचालये वापरु नयेत*.

*२) आपल्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या चपला बूट बाहेर काढण्यास सांगावे* .

*३) ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर ने हात स्वच्छ करण्यास सांगावे* .

*४) चलनी नोटा न हाताळता आपल्याला येणे असलेली रक्कम चेकने अथवा ई पेमेंटने स्वीकारावी* .

*5) आपले मित्र  तसेच नातरवाईक व सहकारी यांचे दरम्यान 4 फूट  अंतर कायमस्वरूपी राखावे* .

*७) कागदपत्रे हाताळताना, वाचताना, पान पलटताना थुंकी लावू नये* .

*८) अगदी गरजेच्या वेळेस ऑफिसमध्ये अथवा पार्किंग मध्ये  उपस्थित राहून भेटावे*

*९) अनेक क्लायंट वा मित्र यांना फोन जोडून देऊन या फोनवर बोला असे म्हणायची सवय असते शक्यतो असा प्रकार अजिबात करू नये फक्त *स्वतःचाच* *मोबाईल फोन वापरावा* .

*१०) आपल्याला भेट देणाऱ्या व्यक्तीने *मास्क* *घातला नसेल तर त्याच्याशी संभाषण करण्यास *स्पष्ट* *
*नकार द्यावा* .

*११) अनेक वेळा गडबडीत आपण थुंकी लावून नोटा मोजतो ते पूर्णपणे टाळावे, रस्त्यावर थुंकु अगर पिंचकारी मारू नका* .

*१२) काम संपल्यानंतर लवकरात लवकर आपल्या घरी जावे व हातपाय धुवावे कपडे धुण्यास टाकावे वा स्वत: धुवावेत*.

*१३) रस्त्यावरील खाद्यपदार्थ,कापलेली फळे खाणे कायमस्वरूपी टाळावेत. घरातील भाजीपाला,फळे मीठाच्या पाण्यात १/२ तास भिजत ठेवावा*.

*१४) जुनी कागदपत्रे हाताळताना हॅण्डग्लोव्हज वापरा जास्तीत जास्त काळजी घ्यावी*.

*१५) परगांवा वरून येणाऱ्या  लोकांची मित्रांची सहकार्याची नातेवाईक यांची  संपूर्ण माहिती फोनवरून घ्यावी व तो आला असेल अंतर ठेवावे* .

*१६) शासनाकडून गेले २महिना ज्या सूचना सुरू आहेत जसे साबणाने हात धुणे या सूचनांचा अंमल कायमपणे सुरू ठेवावा* .

*१७) *शेकहॅण्ड* *पूर्णपणे टाळावेत व आपली परंपरागत नमस्काराची पद्धत अवलंब करावी* .

*१८) लॉक डाउन *संपले वा शिथील केले* *याचा अर्थ रोग *तो विषाणू नष्ट* *झाला असा घेऊ नये* .

*१९) कोरोना झाला तर आपण बरे होऊ शकतो ,तथापि *आजारी* *न पडणे हा उत्तम उपाय आहे* .

*२०) मला काय होतंय,मी ठणठणीत आहे ,माझी इम्युनिटी खूप चांगली आहे , मी आजारी पडू शकत नाही अशा अविर्भावात राहू नये* .

*२१) टू व्हीलरवरून प्रवास करताना पाठीमागील व्यक्तीला कानाजवळ येऊन बोलण्याची सवय असते अशा व्यक्तींना टू व्हिलरवर पाठीमागे बसवून घेऊन जाऊ नये, चार चाकी वाहनातून एकट्याने प्रवास करावा दोघांच्या सुरक्षिततेसाठी चालक टाळावा*.

*२२) फोन,मेसेजेस, व्हॉट्सॲप ,ई मेल या साधनांचा संभाषणासाठी जास्तीत जास्त वापर करावा* .

*२३) निदान यापुढे १वर्षे पुणे ,मुंबई येथील  कामे ( प्रवास करून करावी लागणारी सर्व कामे )शक्यतो टाळावीत, किंवा ई फायलिंग व व्हिसीचा वापर करावा*

*२४) गेल्या २ महिन्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट समजली आहे की,*जगण्यासाठी* *खूप कमी पैसे लागतात जे पैसे जादा लागतात ते पैसे जगण्यासाठी लागत नसून *वागण्यासाठी* *लागतात हे लक्षात ठेवावे* .

*२५) पेट्रोल डिझेल यासाठी वारंवार पंपावर जाणे टाळावे,शक्य असेल त्यावेळी जास्तीत जास्त इंधन भरून घ्यावे* .

*२६) घरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांचेकडे विशेष लक्ष द्यावे*.

*२७)  जत्रा,यात्रा व जेवण,रस्सा पार्टी  यासारखे कार्यक्रम शक्यतो १ वर्ष पुढेच ढकलावेत* .

*आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत ही भावना कायम जागृत ठेवावी*.

*पर्यावरण स्वच्छ झाले असले तरी आपल्याला कोरोना विषाणूंचे सायलेंट कॅरिअर दिसून येणार नाहीत* !!

Friday, May 8, 2020

मना घडवी संस्कार

*मुलांना आज काय शिकविण्याची गरज आहे*
👍रात्री लवकरच झोपणे व सकाळी लवकरच उठणे.
👍किमान 5/10 मिनिटं एका जागेवर शांत बसणे , एकाग्रता वाढविणे .
👍सलग एक ते दोन तास एका जागेवर बसून वाचन , लेखन , अभ्यास करण्याची सवय लावणे .
👍चांगल्या व आवश्यक सूचना ऐकूण घेवून त्यांवर विचार करण्याची सवय लावणे .
👍घरातील लहान मोठ्या व्यक्तींशी चर्चा , संवाद साधने , विचारविनिमय करणे .
👍आपली मते घरांतील व्यक्ती , शिक्षक , सहकारी मित्र यांचे बरोबर व्यक्त करणे .
👍चांगले काय आणि वाईट काय याचा सारासार विचार करुन योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे .
👍खरे काय , खोटे काय याची वास्तवाशी सांगड घालून पडताळा घेणे व सत्याच्या मार्गानेच जाणे .
👍व्यवहारिक द्रुष्ट्या योग्य काय व अयोग्य काय याची समज येणे .
👍अंधश्रद्धा न मानता विदवा विज्ञानाच्या  आधारावर , प्रत्यक्ष पडताळा घ्यायचा प्रयत्न करणे .
👍मोबाईल , T V , सोशियल मेडिया याचा कामापूरता व मर्यादित वापर करणे .
👍घरातील व घराबाहेरील कामे मनापासून करण्याची सवय लावणे .
👍शिक्षण हे फक्त नोकरी मिळण्यासाठी व पैसे कमविण्यासाठी नसून माणुस म्हणून जगण्यास लायक बनविण्यासाठी आहे हे रुजवीणे .
👍नोकरी नाही मिळाल्यास कोणताही व्यवसाय करण्याची क्षमता प्राप्त करणे .
👍आपल्या कुटुंबातील , समाजातील लहान मोठ्या व्यक्तींचा आदर राखण्यास शिकविण्यासाठी शिक्षण असावे .
👍जिवनात नेहमीच आशादायी व सकारात्मक द्रुष्टीकोण निर्माण करायला शिकवीणे .
👍आपली क्षमता पाहून स्पर्धा करणे आवश्यक , अनावश्यक स्पर्धा टाळणे शिकणे आवश्यक .
👍दुसरे करतात म्हणून आपणही तेच न करता वेगळे करण्याचा प्रयत्न करायला शिकवीणे .
👍विनाकारण दुसऱ्यांना कमी लेखने व टीकाटिप्पणी करणे टाळावे .
👍प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात ते घेण्याचा प्रयत्न करायाला शिकवीणे .
👍परीक्षेत किती गुण मिळाले हे महत्वाचे नसून त्यांचेमध्ये किती नितिमुल्ये रुजली हे महत्वाचे आहे .
👍अब्राहम लिंकनने  हेडमास्तर यांना लिहिलेले पत्र किमान आठवड्यातून एकदा वाचून  दाखवून त्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगणे .
👍 साने गुरुजी यांचे शामची आई या व अशा  कथा वाचुन त्याचा अर्थ समजून घेण्यास शिकवीणे .
👍स्वकष्टाने कमविलेल्या एका छदामची किंमत वाम मार्गाने कमवीलेल्यl घबाडापेक्षा किती तरी पटीने जास्त असते हे शिकणे आवश्यक आहे .
👍चांगले इंग्रजी शिकला म्हणजे हुशार झाला असे नसून मातृभाषेतून संस्कार व व्यवहार  शिकला म्हणजे हुशार झाला .
आजकाल या व अशाच शिक्षणाबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे तर आणि तरच तो विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होईल आणि जिवन जगण्यास लायक होईल असे वाटते .

*पालक -शिक्षक वर्गाने यांवर जरूर विचार करावा

Wednesday, May 6, 2020

Face Reading

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


समोरच्या व्यक्तीचा चेहरा ओळखता आला पाहिजे !!!



तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा चेहेरा वाचता येतो का? समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावरून त्या व्यक्तीबद्दल तुम्ही काही गोष्टी सहज जाणून घेऊ शकता. *FACE READING* म्हणजेच,एखाद्याचा चेहरा कसा वाचायचा ते समजून घ्या ह्या लेखात.

तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे अंतरंग जाणून घ्यायचे असेल तर त्याचा चेहेरा वाचता यायला पाहिजे.

तुम्हाला लग्न करायचंय, आयुष्याचा जोडीदार निवडायचाय असेल तर, तर निदान त्याच्याबद्दल काही गोष्टी तरी निश्चित जाणून घेतल्या पाहिजेत ना?

एवढेच नाही तर एखाद्या व्यक्तीबरोबर व्यवसाय करायचा असेल तर ती व्यक्ती कशी आहे हे आपल्याला जाणून घ्यायलाच पाहिजे.

कोणत्याही व्यक्तीचा चेहेरा बोलत असतो, तो आपल्याला त्याची काही ठळक वैशिष्ट्ये सांगतो. म्हणून आपल्याला समोरच्या व्यक्तीचा चेहेरा वाचता यायला पाहिजे.

मग चेहेरा कसा काय वाचायचा हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहिला आहे ना? तर मित्रांनो, आपल्या डोळ्यांची रचना, कपाळाची ठेवण, ओठांच्या हालचाली, त्यांचा आकार, कान, कानांचा आकार, लांबी, कानांची ठेवण, ह्या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला जाणून घेता येईल की समोरची व्यक्ती कशी आहे.

आधी आपण डोळे, डोळ्यांची ठेवण, आकार आणि ते काय सांगतात ते बघू.

आपण कोणत्याही माणसाशी जेंव्हा बोलायला जातो त्यावेळी सगळ्यात आधी आपलं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे जातं. त्याच्या डोळ्यांकडे बघितल्या शिवाय आपल्याला कळत नाही समोरची व्यक्ती आपल्याकडे बघतीये, का तीचं लक्ष दुसरीकडे कुठे आहे.

डोळ्याकडे लक्ष गेलं की कळतं, ‘हाँ! ती व्यक्ती आपल्याकडे बघते आहे!!’ आणि नंतर मग आपण बोलायला सुरुवात करतो.

*पण डोळ्यांकडे बघताना आपण काय जाणून घ्यायचं ते लक्षात घ्या.*

१) समोरच्या व्यक्तीचे दोन्ही डोळे कसे आहेत? म्हणजे त्याच्या दोन्ही डोळ्याच्या आतल्या दोन्ही टोकांमध्ये किती अंतर आहे.

दोन्ही डोळ्यांच्या मध्ये नाक तर असतंच. पण जर पसरट नाक असेल तर दोन्ही डोळ्यातलं अंतर जास्त असतं. आणि नाक शार्प असेल तर दोन्ही डोळे जवळ जवळ असतात. म्हणजेच अंतर कमी असतं.

आता ह्या दोन्ही डोळ्यांच्या कमी आणि जास्त अंतरावरून त्या व्यक्तीबद्दल आपल्याला नक्की काय ज्ञान होतं ते बघा..

ज्या लोकांच्या दोन्ही डोळ्यातलं अंतर जास्त असतं ते लोक कोणतं ही काम करत असतील ते काम अगदी सहज जाणून घेतात. त्यांना फार खोलात शिरून ते काम जाणून घ्यायची आवश्यकता नसते.

त्यांच्या हाताखालचा माणूस जर चांगले रिझल्ट्स देत असेल तर ते खुश असतात. त्याने ते काम कसं केलं? किती वेळात केलं ह्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं.

ह्याच्या उलट ज्या लोकांच्या दोन्ही डोळ्यांमधलं अंतर कमी असतं म्हणजे त्यांचे डोळे नाकाच्या अगदी जवळ असतात ते लोक कोणतंही काम करताना डिटेल्स जाणून घेऊन नंतरच सुरू करतात.

कोणी चांगले काम केले तर त्याने ते चांगलं कसं केलं ते सुद्धा जाणून घेतात. ते काम दुसऱ्या पद्धतीने केलं असतं तर काय फरक पडला असता?

थोडक्यात हे लोक जास्त चिकित्सक असतात. प्रत्येक विषयाचा अगदी खोलवर विचार करतात किंवा अभ्यास करतात.

२) ज्या लोकांच्या डोळ्यांची बाहेरची टोकं ही वरच्या बाजूला वळलेली असतात किंवा काहींची खालच्या बाजूला वळलेली असतात किंवा काही लोकांची अगदी सरळ असतात त्यांबद्दल जाणून घेऊ.

ज्यांचे डोळे थोडे वरच्या बाजूला वळलेले असतात ते लोक नेहमीच पॉझीटीव्ह विचार करतात. निगेटिव्हीटी मध्ये सुद्धा पॉझिटिव्हीटी शोधतात.

ज्यांचे डोळे सरळ असतात ते लोक निगेटीव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्हीचा बॅलन्स साधणारे असतात. आणि ज्या लोकांचे डोळे खालच्या बाजूला झुकलेले असतात ते जरा आत्मविश्वास कमी असलेले, निगेटिव्ह विचार करणारे असे असतात.

ज्या लोकांचे डोळे नॉर्मल असतात म्हणजे आतल्या बाजूला व्यवस्थित असतात ते लोक नॉर्मल असतात. पण ज्या लोकांचे डोळे बाहेर आलेले असतात ते लोक तुम्हाला फाडून खाणारे असतात. म्हणजेच ऍग्रेसिव्ह असतात. छोट्या मोठ्या कारणाने अंगावर धावून येणारे असतात. चिडखोर असतात. संतापी असतात. आपलंच खरं करणारे असतात.


हे झालं डोळ्यांवरून चेहेरा कसा वाचायचा?

*आता कान बघू. म्हणजे तुमच्या कानांची ठेवण कशी आहे त्यावरून तुमची काय ओळख ठरते?*

तुम्ही कोणाच्याही चेहेऱ्याकडे बघितलं की कानांवरून समोरच्या व्यक्तीचा चेहेरा काय काय सांगतो ते बघा.

१) तुमचे कान आकाराने जरा मोठेच असतील तर तुम्ही बहुश्रुत म्हणून ओळखले जाता. म्हणजे बोलण्यापेक्षा तुम्ही लोकांचं ऐकून घेणं पसंत करता.

कोणीही तुमच्याशी काही बोलायला आलं की तुम्ही आधी त्यांचं नीट ऐकून घेता आणि नंतर आपली बाजू मांडता. खूप ऐकण्या मुळे अशा लोकांकडे ज्ञानाचा साठा पण जास्त असतो.

काही स्त्रियांना आपला पती आपलं सगळं ऐकणारा असावा असं वाटत असेल तर ज्या व्यक्तीचे कान मोठे आहेत अशा व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करायला हरकत नाही.

२) पण लांब कान असून ते वरच्या बाजूने जास्त बाहेर आलेले असतील तर अशी व्यक्ती ऐकून घेते पण आपला हेका कधी सोडत नाही. उदाहरण म्हणून, असे कान अमीर खान चे आहेत ते तुम्हाला सहज कोणत्या जाहिरातीत दिसून येतील.

आणि कदाचित याचमुळे हे लोक जर हुशार असतील तर परफेक्शनिस्ट तरी होतात नाहीतर हेकेखोर होतात.

परफेक्शनिस्ट लोकांबद्दलच्या पूर्वी लिहिलेल्या एका लेखाची लिंक शेवटी दिलेली आहे.

३) ज्यांचे कान लहान आणि बरोबर पाहिजे तसे आहेत ते लोक दुसऱ्याचं ऐकून घेतील आणि स्वतः बद्दल पण सांगतील. पण ज्यांचे कान खूप लहान असतात ते लोक फक्त आपलंच घोडं पुढं दामटतात. दुसऱ्याचं ऐकून घेत नाहीत.

आपल्या नाकाच्या नाकपुडीच्या खालच्या टोकापासून आपल्या कानापर्यंत सरळ रेषा मारली तर त्या रेषेच्या वर ज्यांचे कान असतात ते लोक सगळ्या गोष्टी पटकन आकलन करून घेतात. पण झटकन, पटकन जाणून घेण्याच्या नादात कधी कधी चूक करतात.

आणि त्या रेषेच्या बरोबर ज्यांचे कान असतात त्यांना नीट बघून समजून घेण्याची सवय असते. त्यात थोडा वेळ जातो पण चुका कमी होतात.

*आता जाणून घेऊ ओठ. ओठांची ठेवण, जाड ओठ, पातळ ओठ काय सांगतात तुमच्याबद्दल?*

१) जे लोक तोंड भरून हसतात, म्हणजे अगदी मोकळं हसतात त्यावेळी तोंड जास्तीत जास्त उघडलं जातं आणि मनसोक्त हास्य चेहेऱ्यावर दिसतं.

असं मुक्त हास्य करणारे लोक सोशल असतात. म्हणजे त्यांना भरपूर मित्र असतात, जीवनाचा आनंद ते लोक अगदी मनापासून घेतात. खळखळून हसतात, आणि दुसऱ्याला सुद्धा खळखळून दाद देतात.

ज्या लोकांचं तोंड हसताना फक्त स्माईल, किंवा थोडंच उघडून हसून लगेच बंद होतं. त्यांचा तोंडाचा आकार सुद्धा लहान असतो. असे लोक जरा रिझर्व्ह माइंडेड असतात. मराठीत त्यांना आपण आतल्या गाठीचे म्हणतो.

२) आपले ओठ सुद्धा आपली वैशिष्ट्य लोकांना सांगतात. वरचा ओठ ज्यांचा जाड असतो ते लोक समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर अगदी स्पष्ट बोलतात.

आणि ज्यांचा खालचा ओठ जाड असतो असे लोक एखाद्या कडून काही जाणून घ्यायचं असेल त्याच्या पाठमागेच लागून ती गोष्ट जाणून घेतात. पिच्छा पुरवतात.

ज्यांचा वरचा ओठ पातळ असतो ते लोक सुद्धा रिझर्व्ह असतात. कोणाच्या समोर कधी घड घड बोलत नाहीत. असे लोक तुम्ही व्यवसायासाठी पार्टनर म्हणून घेतले तर. तुमच्यात आणि त्यांच्या विचारात खूप मोठा फरक पडतो.

*आता बघुयात कपाळ. ह्याला माथा पण म्हणायला हरकत नाही.*

माणसाचा माथा म्हणजे पॉवर हाऊस असतं. सगळी पॉवर तिथे असते. कपाळाच्या मागे माणसाचा मेंदू असतो ना, मेंदू तुमच्या संपूर्ण शरीराला कंट्रोल करत असतो.

१) तुमचा मेंदू कसा आहे हे तुमच्या कपाळावरून समजतं. तुमच्या कपाळाचा आकार कसा आहे त्यावरून तुमच्या पॉवर हाऊस ची कल्पना येते.

भव्य कपाळ असं आपण एखाद्या व्यक्तीच्या चेहेऱ्याचं वर्णन करताना करतो. भव्य म्हणजे कपाळाचे उंची जास्त असते.

ह्या भव्य कपाळ असलेल्या लोकांच्या मेंदूत पण भरपूर डाटा साठवायला जागा असते. ते लोक एखादं काम करत असतील तरी त्या कामाची पूर्ण डिटेल्स घेतात. पूर्ण ज्ञान मिळवतात आणि त्याचा भरपूर साठा सुद्धा त्यांच्या मेंदूत करून ठेवतात.

ज्याचं कपाळ रुंद असतं म्हणजे समोरून दिसणारं कपाळ. आडवी रुंदी (चेहेऱ्याची रुंदी) जास्त असलेले लोक हे सुद्धा खूप डाटा साठवू शकतात.

म्हणजे एक काम तर ते परफेक्ट करतातच, पण अनेक कामात ते पारंगत असतात, म्हणजे अभ्यासात हुशार असले तरी, स्पोर्ट्स मध्ये पण तेवढेच हुशार असतात, त्यांच्याकडे कला सुद्धा अनेक असतात. ते सायन्स मध्ये पण आपलं वर्चस्व सिद्ध करतात, तसं खाण्याचे पदार्थ सुद्धा अगदी टेस्टी बनावू शकतात.

२) काही लोकांचं कपाळ मागच्या बाजूला जास्त झुकलेलं असतं, तर काही लोकांचं कपाळ अगदी सरळ असतं, तर काही लोकांचं पुढच्या बाजूला जास्त बाहेर आलेलं असतं, तर काही लोकांचं कपाळ अर्ध गोलाकार बाहेर असतं.

जास्त मागे झुकलेलं कपाळ असलेली माणसं जरा उतावळी असतात. त्यांच्यात संयम नसतो. सरळ कपाळ असलेली माणसं बॅलन्स साधून असतात. त्यांच्यात संयम सुद्धा असतो.

कपाळ पुढे जास्त असलेली माणसं हुशार असतात, संयमी असतात. आणि अर्ध गोलाकार कपाळ असलेली माणसं खूप ऍडजस्टेबल असतात. संयमी असतात.

आयुष्यात आपला जोडीदार किंवा बिझिनेस पार्टनर निवडण्यासाठी ह्या फेस रीडिंगचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. साधारण पणे हे ठोकताळे लक्षात ठेवून तुम्ही रोजच्या जीवनात तुमच्या सहवासात येणाऱ्या लोकांचे चेहेरे वाचून हळू हळू अनुमान लावून अभ्यास करू शकता.

आणि नंतर तुमच्या स्वतःच्या आयुष्यात योग्य लोकांची निवड करून यशस्वी होऊ शकता. हे फेस रीडिंग निश्चित मार्गदर्शक ठरू शकेल.

ह्यात आणखी बरेच छोटे छोटे पैलू आहेत जे अभ्यास करून तुम्हाला शिकता येतील. पण सहज नजर टाकल्यावर चेहेरा वाचून तुम्ही माणसं ओळखून बराच काही तुमचा फायदा करून घेऊ शकता.

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

रामायण कालीन ऋषी

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹                .        .       *सप्त ऋषी*

          आज पर्यंत आपण सप्त ऋषींचे नावच ऐकत आलो आहोत. आज आपण त्यांचा बद्दलची माहिती जाणून घेऊ या.. कोण कोण आहे हे सप्तर्षी...


1 ऋषी वशिष्ठ -
         ऋषी वशिष्ठ अयोध्याचे राजा दशरथाचे कुलगुरू तसेच त्यांचे चारही मुलं श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नचे गुरु होते. ह्यांचा सांगण्यावरूनच दशरथाने आपल्या चारही मुलांना ऋषी विश्वामित्रांच्या बरोबर असुरांचा संहार करण्यासाठी आश्रमात पाठविले. अशी आख्यायिका आहे की कामधेनू गायीच्या प्राप्तीसाठी गुरु वशिष्ठ आणि गुरु विश्वामित्रांमध्ये युद्ध झाले होते.

2 ऋषी विश्वामित्र -
           ऋषी बनण्यापूर्वी विश्वामित्र एक राजा होते. ते ऋषी वशिष्ठांची कामधेनू गायीला स्वतःच्या तावडीत घेण्याचा प्रयत्नात होते आणि तसं त्यांनी प्रयत्न देखील केले. त्यांनी युद्ध केले आणि ते त्या युद्धात पराभव झाले. या पराभावाने ते तप करण्यासाठी प्रवृत्त झाले. तप करण्याचा वेळी त्यांची तपश्चर्या इंद्रलोकाच्या एका अप्सरेने मेनकाने भंग करण्याचा प्रयत्नही केला. विश्वामित्रांनी एका नव्या स्वर्गाची स्थापनाही केली होती. चमत्कारी आणि सर्वात प्रभावी गायत्री मंत्राची रचना देखील ऋषी विश्वामित्राने केली आहे.


3 ऋषी कण्व -
              हे वैदिक काळाचे ऋषी आहे. ऋषी कण्वने यांनी आपल्या आश्रमात हस्तिनापुराचे राजा दुष्यन्तची बायको देवी शकुंतला आणि त्यांचा मुलगा भरत यांचे सांभाळ केले होते. भारत देशाचे नाव या भरत च्या नावांवरूनच ठेवले गेले आहे. ऋषी कण्व हे लौकिक ज्ञान - विज्ञान आणि अनिष्ट निवारणासाठीचे असंख्य मंत्रांचे रचयिते आहे.

4 ऋषी भारद्वाज -
           वैदिक ऋषींमध्ये ऋषी भारद्वाजांचे उच्च स्थान आहे. गुरु बृहस्पती यांचे वडील आणि देवी ममता यांची आई होती. श्रीरामाच्या जन्माच्या आधी यांचे अवतारण्याचे उल्लेख आहे. कारण वनवासाच्या काळात श्रीराम ह्यांचा आश्रमात गेल्याचे म्हटले आहे. भारद्वाज ऋषींनी अनेक वेदमंत्रांची रचना केली आहे. त्यांनी भारद्वाज स्मृती आणि भारद्वाज संहिता रचिल्या आहे.


5 ऋषी अत्री -
         ब्रह्मदेव यांचे पिता, सोमदेव यांचा मुलगा आणि कर्दम प्रजापती आणि देवी देवहूती यांची कन्या देवी अनुसूयाचे पती होय. एका आख्यायिकांचा अनुसार एकदा ऋषी अत्री बाहेर गेलेले असताना त्रिदेव मुनींच्या रूपात यांचा आश्रमात भिक्षा मागण्यास आले होते. देवी अनुसुयाने देवी सीतेला पतिव्रता धर्माची शिकवणी दिली होती. ऋषी अत्री आणि देवी अनुसूया चंद्रमा, मुनी दुर्वासा आणि भगवन दत्तात्रेयांचे आई वडील असत.

6 ऋषी वामदेव -
         संगीताची उत्पत्ती वामदेव यांनी केली आहे. असा उल्लेख केला जातो. हे ऋषी गौतमाचे पुत्र होते. भरत मुनीने रचिल्या भरत नाट्य शास्त्र हे सामवेदांकडूनच प्रेरित असल्याचे समजते. सहस्त्रवर्षां पूर्वीचे रचलेल्या सामवेदामध्ये संगीत आणि सर्व वाद्य यंत्रांची माहिती मिळते.


7 ऋषी शौनक -
.       पुरातन काळात दहा सहस्र विद्यार्थ्यांचे गुरुकुल याच ऋषीने निर्मित केले होते. ह्यांना कुलगुरू होण्याचा मान मिळाला आहे. प्रथमच कोणा गुरूस हा सन्मान प्राप्त झाल्याचे समजते. अनेक मंत्रांचे हे रचयिते आहे..
संग्रहित.माहिती
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹