Wednesday, September 30, 2020

आरसा व सदगुण

 ➖🕳♍💲🅿🕳➖

 ❱❱ *महाराष्ट्र शिक्षक  पँनल* ❰🌹🌹*आरसा आणि सद

    🌹🌹*आरसा आणि सदगुण*🌹🌹

💢  एक गुरूंच्या आश्रमात एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. 


             शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’ 


तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्‍मनिरीक्षण केले तर आपल्‍यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

                



 

Tuesday, September 29, 2020

पेन आणि संस्कार

            🙏पेन आणि संस्कार 🙏


     पुण्याला जात असताना एका ठिकाणी चहा पिण्यासाठी  थांबलो..... 

     एक १२/१३ वर्षाचा साधे कपडे घातलेला चुणचुणीत मुलगा माझ्या मागे रेंगाळत असल्याचं जाणवलं.....

     चहापान झाल्यावर निघालो तेव्हा माझी नजर त्याला शोधत होती.....

     गाडीपासून २०/२५ फुटांवर झाडाच्या आडोशाला "तो" उभा होता..... नजर माझ्याकडे.

     मी त्याला जवळ बोलावलं.....

     " भूक लागली का ?"  विचारलं.....

     तो मानेनंच नाही म्हणाला.....

     माझी उत्सुकता वाढली.....

     " पैसे पाहिजेत ??"

     " नाही"

     " मग ?"

     पाठीमागे लपवलेला पुष्ट्याचा प्याड,  निबंधाची वही अन् रिफील संपलेला रुपयाचा पेन (Use & throw) त्याने दाखवला.....

     ....." पेनची नळी संपली .....

     घेऊन द्या ना ....!!"

     मी ५/- रूपये दिले.

     तो..... " पैसे नको नळी घेऊन द्या "

     मी म्हटलं  " का ? "

     तो... " माझी माय म्हणली, कुणाकडून फुकटचे पैसे घ्यायचे नाही." 

     ..... मी जितके फुकटचे पैसे घेईन तितकं माझ्या मायचं आयुष्य कमी हुईल....!!

     त्याचं उत्तर ऐकून माझ्या डोक्यात प्रश्नांचं काहूर उठलं.....

     माझी माणुसकीची नशा..... खाडकन उतरली.....

     दातृत्वाचं ढोंग त्याच्या एका संस्कारापुढे कवडीमोल ठरलं.....

     मी गाडीतून उतरलो..... त्यांचं नाव विचारलं..... बंड्या.

     बंड्या मला टपरीकडे घेऊन गेला..... पेन घेतल्यावर बंड्या खुलला. माझ्या डोक्यातल्या प्रश्र्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो.

     मी:- कितवीत आहेस ?

     बंड्या:- मराठी ७ वीत....

     मी:- काय लिहितोस ???

     बंड्या:- निबंध..... माझी आई !!!!

     मी:- कुठे राहतोस ?

     बंड्याने शेताकडे बोट दाखवलं..... लांब वर एक झोपडी दिसत होती..... बंड्याचा बाप शेतावर जागल्या होता..... आई शेतावर मजुरी करत होती..... बंड्याला चार भावंडे होती. मी वही हातात घेऊन चाळली.....

     बंड्या झेड पी च्या शाळेत होता. त्याचं पूर्ण नाव वाचलं. अन् मग विचारलं, " माझ्याकडेच नळी का मागितली.....?"

     बंड्या  गांगरला.....

     मी परत विचारलं " इथं इतके लोक आहेत, मग माझ्याकडेच नळी का मागितली ?"

     बंड्या:- " तुमच्याच खिशाला पेन दिसला म्हणून!!!!" मग मी सगळीकडे बघितलं..... बरेचसे लोक टी शर्ट वर होते. काहींना खिसे नव्हते..... तर काहींच्या खिशाला पेन नव्हते..... बंड्याचे निरिक्षण अचूक होते..... माझ्या खिशाला माझा आवडता पेन होता. 

     मी:- " तुला कोण व्हायचंय, मोठा झाल्यावर ?".....

     बंड्या:- " फौजदार !!!"

     मी:- " फौजदार ? कसा काय ?? कुणी सांगितलं .....??"

     बंड्या:- " मास्तर  म्हणले की मी खूप अभ्यास केला की फौजदार  होईल.....!!"

     मला त्याचं उत्तर आवडलं.....!!

     माझ्या बरोबरचे मित्र वैतागले होते.....!

     स्वत:च्या  आयुष्याला फुकटचे पैसे न घेण्याच्या संस्काराशी जोडणा-या त्या माऊलीला

     अन्

     निरागस डोळ्यांमध्ये फौजदार होण्याचं स्वप्न देणा-या झेड पी च्या गुरूजींना मी मनोमन नमस्कार केला....!

     माझ्या खिशाचा आवडता पेन काढला.....

     बंड्याच्या खिशाला लावला.....!

     त्याच्या खांद्यावर हात ठेवला..... अन् माझ्या आवडत्या देशाच्या भावी इन्स्पेक्टरशी शेकहॅंड करून गाडीत बसलो.....!! तो गाडीकडे बघत हात हलवत होता.....!!

     मी निश्चिंत होतो.....

     कितीही भ्रष्टाचार वाढो.....

     जोपर्यंत अशा माऊल्यांचे संस्कार आहेत तोवर माझ्या देशाचं भविष्य उज्वल असल्याबद्दलची मला खात्री पटली.....!!

      

धन्य ती माता, धन्य तो पिता  

   🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏