Tuesday, February 2, 2021

विद्येची किंमत

 *🥀 विद्येची किंमत 🥀* 


*एकदा* रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी गंगेवर गेले. त्यावेळी एक सिध्द पुरुषही तेथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली, तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले, तुमचे गुरू असा चमत्कार करू शकतील का ? बारा वर्षे तप करुन मी ही सिद्धी मिळवली आहे.


*शिष्याने* रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले , "त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणे किंमतीचा आहे."


*शिष्याने* हा निरोप सिद्ध पुरूषाला सांगितला. तो भलताच भडकला. म्हणाला, "पुन्हा असे म्हणालात तर तुमचे भस्म करून टाकीन."

रामकृष्णांनी पुन्हा तसचं म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यानांच सिद्ध पुरुषाने त्याचा अर्थ विचारला.


*रामकृष्ण म्हणाले,*

"नावाडीसुध्दा दोन आण्यात पैलतीराला नेतो. त्याचा इतरांना उपयोग होतो. पण तुमची विद्या फक्त तुमच्यापुरतीच आहे. ज्या विद्येचा लोकांना उपयोग होत नाही. तिची किंमत शुन्य आहे."


*🔅 तात्पर्य :-*


*माणसाने आपल्या विद्येचा, कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा.*  👏👏👏👏

Saturday, January 9, 2021

पसायदान

 *पसायदान....* 


 *मनाला थक्क करणारी निस्पृह विश्वप्रार्थना...*


ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर.  तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार.


आपल्या सर्वाना अगदी तोंडपाठ असेल ना पसायदान.. अगदी लहानपणापासून आपण लता मंगेशकरांच्या आवाजातील सुमधुर पसायदान ऐकत आलोय किंवा शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदान चा समावेश असायचा. पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेला नाही हे आपले दुर्दैव आहे. 


मी जेव्हा याचा अर्थ वाचला तेव्हा खरे तर थक्क झालो. खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलेच नाही. आपण आता या विश्वप्रार्थनेचा अर्थ पाहू...


*आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥*


- या विश्वात्मक (विश्वाच्या कणा कणांमध्ये भरून राहिलेल्या ) माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे. त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान दयावे. 


*जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥*


- मग ऐक माझे मागणे. या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यातल्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात. तू फक्त तेच काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वीतलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील.


- भगवंताकडे मागणे मागताना माउलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलाची जास्त काळजी वाटते. कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून देवत्वाकडे वाटचाल सर्व करू शकतो हा त्यांना विश्वास आहे.


*दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥*


- जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे. हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मरुपी सूर्याचा उदय होवो. प्राणीमत्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत.


- इथे विश्व स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, बौध्ह इत्यादी धर्म नव्हेत तर "माणुसकी" हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल.


*वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥*


- या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो. सध्या "नश्वर" गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे. धन संपत्तीलाच "सुख" मानणारे लोक नकोत तर आत्म्याचे चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत.


*चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥*


-ईश्वरनिष्ठ लोक म्हणजेच संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत, चेतानारूपी चिंतामणी रुपी गाव आहेत, त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहेत. कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी. जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा या ओवीचा मतितार्थ.


- माउलींच्या काव्यामध्ये उपमात्मक दृष्टांत सदैव खूप सुंदर असतात. संतांना इतकी सूचक उपमा देऊन त्यांच्या कार्याचा अभिव्यक्त गौरवच केला आहे.


*चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥*


- जो मनुष्य, चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे (अंधारामध्ये सुद्धा दुसर्याला साथ देणारा) आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा  सूर्यच आहे. त्याला सदैव सज्जन लोकांचाच संग मिळतो व त्याचे सोयरे ही अगदी त्याच्यासारखेच होतात.


*किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥*


- विश्वामध्ये (तिन्ही लोकातील) लोक सर्वसुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहोत. तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याचा लोकांची इच्छा कमी होत जाते. आणि ते न होण्याची मागणी माउली करतात.


*आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥*


- आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे, त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे. आणि त्याच ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे. 


- जीवन सुखी करणे हे काही Rocket Science  नाहीये. जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकामधून आपल्याला भेटतो. ग्रंथांना जीवन माना आणि जीवनच बदलून टाका.


*येथ म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥*


- हे विश्वेशराया... हे जगाच्या मायबापा बापा... तू जेव्हा म्हणशील ना कि हे दान दिले.....तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल...


तर असा आहे या विश्व प्रार्थनेचा गुढार्त... ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ९००० ओव्यांचे हे सार आहे... एका आदर्श समाजव्यवस्थेचे स्वप्न या जगद्माउली ने ८०० वर्षापूर्वी पाहिले. आज तागायत अखंड आषाढी वारी सुरु आहे, लाखो लोक या भक्तीसागरात बुडून सदैव आळंदी ते पंढरपूर हा भक्तीचा सेतू बांधत आहे.. ते करता करता आपण आजच्या सगळ्यात जलद माध्यमाचा म्हणजेच Internet चा वापर सत्कार्यासाठी करूया.


🙏🏻🌹.....विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🏻

Wednesday, December 30, 2020

🌹🌹 श्री कृष्ण आणि कर्ण

 *कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो.यात माझी काय चूक होती?*

🌹🌹 श्रीकृष्ण आणि कर्ण 🌹🌹

*मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं,कारण मी क्षत्रिय नव्हतो.*


*परशुरामांनी मला विद्या दिली,पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल.कारण मी क्षत्रिय नव्हतो!*


*एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.*


*द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.*


*कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.*


*मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.*

*तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"*


*कृष्णाने उत्तर दिले :-*


*"कर्णा,माझा जन्म कारागृहात झाला.*


*जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता.*


*रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.*


*तुम्ही तलवारी,रथघोडे,धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.*


*मला गौशाला,शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.*


*ना कोणती सेना,ना शिक्षण.*


*मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे,असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.*


*तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.*


*सांदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.*


*तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले.*


*माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही,तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.*


*मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.*

*मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.*


*जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल.धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल...फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.*


*एक गोष्ट लक्षात घे कर्णा...*

*प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत*


*आयुष्य कोणासाठी ही कधी ही सोपे नाही*


*दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.*


*परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...*


*कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,*

*कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,* 

*कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,*


*तरी ही*


*त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.*


*तक्रारी थांबव कर्णा!*


*आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.*


*म्हणून,तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा,भगवतांचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा,चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा.स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद...!*


    *🙏 जय श्रीकृष्ण 🙏*  

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃


*पायातून काटा निघाला की चालायला मजा येते,तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते.*

Friday, December 18, 2020

भावना व अहंकार

 

         🌹🌹 भावना व अहंकार🌹🌹

*एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही..* ह्या अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो, म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला..


*कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की,लक्षात येतं की असे अनेकजण ज्यांनी आपल्याला दुखावलं म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच...*


भावना दुखावल्या, असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो..

आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली. 


त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली, हे कळलंच नाही. 


आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं.

त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या...


*भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो.*


भावना दुखावली असं आपण म्हणतो,तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो.


अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली, तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं..


*जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं.*


कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात..

तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं, असं मात्र नक्कीच वाटून जातं.


क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा, आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं..


बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याचा नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो.. परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो, अन आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही.

म्हणून...


*कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा व नात्यापेक्षा मोठी नाहीच...!*

🙏🙏🙏 रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏

Thursday, December 17, 2020

संत संगतीचे फळ

      🌹🌹 *संत संगतीचे फळ*🌹🌹

*आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असतो. तो असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही....!!*

         

       *जो पर्यंत बिभीषण लंके मध्ये राहत होते तो पर्यंत रावणाने पाप केले पण बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता....!!*


       *परंतु जेव्हा बिभीषणा सारख्या भगवंतवत्सल भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाण्यास सांगितले, तेव्हापासून रावणाचा  विनाश होण्यास  सुरूवात झाली आणि शेवटी  रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही....!!* 


       *अशाचप्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदूर सारखे भक्त राहत होते तो पर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की काका आपण तिर्थ यात्रेला जावे. जसे विदुरने हस्तिनापूर सोडले,कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि  कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही....!!*


       *याचप्रकारे आपल्या कूटूंबात अथवा मित्र परीवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तो पर्यंत  आपण व आपल्या घरात आनंदी आनंद राहतो..*

*विचार करा एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेंव्हा मनापासून आपला त्याग करते तेंव्हा पासून आपली ओहटी सुरु होते यासाठी भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमाऊन खातो ते माहित नाही कुणाच्या पुण्याईने  मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका तर सन्मान करा. व _त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा_. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते....!!*


       *आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा. व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे जीवन जगा व देवाची भक्ती करत रहा....!!*


       *कर्मानुसार आले तर बरे झाले, गेले तर बला टळली असा भाव ठेवा*.

 

 *सोबत काही घेऊन आलो नाही, जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा...

गुरूदेव म्हणतात की "कर भला तो हो भला"....