Tuesday, February 2, 2021

विद्येची किंमत

 *🥀 विद्येची किंमत 🥀* 


*एकदा* रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी गंगेवर गेले. त्यावेळी एक सिध्द पुरुषही तेथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली, तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले, तुमचे गुरू असा चमत्कार करू शकतील का ? बारा वर्षे तप करुन मी ही सिद्धी मिळवली आहे.


*शिष्याने* रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले , "त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणे किंमतीचा आहे."


*शिष्याने* हा निरोप सिद्ध पुरूषाला सांगितला. तो भलताच भडकला. म्हणाला, "पुन्हा असे म्हणालात तर तुमचे भस्म करून टाकीन."

रामकृष्णांनी पुन्हा तसचं म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यानांच सिद्ध पुरुषाने त्याचा अर्थ विचारला.


*रामकृष्ण म्हणाले,*

"नावाडीसुध्दा दोन आण्यात पैलतीराला नेतो. त्याचा इतरांना उपयोग होतो. पण तुमची विद्या फक्त तुमच्यापुरतीच आहे. ज्या विद्येचा लोकांना उपयोग होत नाही. तिची किंमत शुन्य आहे."


*🔅 तात्पर्य :-*


*माणसाने आपल्या विद्येचा, कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा.*  👏👏👏👏

No comments:

Post a Comment